GRAMPANCHAYAT TARNDALE
उद्दिष्टे आणि ध्येय
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे व कार्य
1. पायाभूत सुविधा विकास
-
ग्रामपंचायतमार्फत रस्ते डांबरीकरण, पाणीपुरवठा योजनांचे देखभाल व विस्तार.
-
एलईडी लाईट बसवणे व सार्वजनिक ठिकाणी विजेची सुविधा वाढवणे.
2. स्वच्छता व आरोग्य
-
गावात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय निर्मिती व कचरा व्यवस्थापन.
-
प्राथमिक आरोग्य शिबिरे, लसीकरण मोहिमा आयोजित केल्या जातात.
3. शिक्षणाचा प्रसार
-
जिल्हा परिषद शाळांची सुधारणा व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण.
-
मुलींच्या शिक्षणावर विशेष भर.
4. जलसंधारण व कृषी विकास
-
शेततळे, गटारी, बंधाऱ्यांचे बांधकाम.
-
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे आयोजित.
5. महिला व बालकल्याण
-
महिला बचत गटांना आर्थिक मदत व प्रशिक्षण देणे.
-
अंगणवाडी सेवांद्वारे बालकांचे पोषण व शिक्षणाची व्यवस्था.
6. रोजगार निर्मिती
-
मनरेगा योजनेंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
-
युवकांसाठी स्वयंरोजगार व प्रशिक्षण कार्यक्रम.
7. पारदर्शक व लोकसहभागी प्रशासन
-
दरमहा ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांचे प्रश्न ऐकले जातात व निर्णय घेतले जातात.
-
शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाते.
स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार गाव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन उपक्रम राबवणे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा आणि निवारा संबंधित सुविधा पुरवणे.
प्रशिक्षणाद्वारे विकास कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींना सक्षम बनवून पंचायती राज व्यवस्थेचे बळकटी देणे.